महादेव परब माखजन इंग्लिश स्कूल चे नवे मुख्याध्यापक

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापक पदी महादेव परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रुही पाटणकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.महादेव परब ह्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली.महादेव परब हे एम.ए. बी एड असून त्यांना माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरावर शिकवण्याचा प्रदीर्घ असा २० वर्षांचा अनुभव आहे.तर इंग्रजी विषयाचे मॉडेरेटर म्हणून काम केले आहे.माखजन इंग्लिश स्कूल येथे ते सलग १९ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत.
त्यांच्या निवडीनिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.१ ऑगस्ट पासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.यानिमित्त संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.यावेळी उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.