सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना एकसंघ!

शिवसेना महिला माजी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी मांडली भुमिका

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर करण्यासाठी सर्व पदाधिकारी शिवसैनिक एकसंघ पणे काम करतं आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना राज्यात अग्रेसर ठरेलं. असा विश्वास शिवसेना माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी व्यक्त केला.

वर्षा कुडाळकर यांसह उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कुंभारमाठ निवासस्थानी भेट देऊन संघटनात्मक विविध विषयावर चर्चा केली. दत्ता सामंत यांच्या सोबत सर्व चर्चा सकारात्मक झाली असे सांगत वर्षा कुडाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी यापूर्वी महिला जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. नव्या कार्यकारणीत दीपलक्ष्मी पडते यांना जिल्हाप्रमुख म्हणून संधी मिळाली. मात्र मला पदावरून काढले अश्या चर्चा पसरवून आमच्या संघटनेत वाद आहेत अश्या चर्चा रंगवत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र आम्ही सर्वजण एकसंघ आहोत.

आमदार निलेश राणे नेहमीच सर्वांच्या संपर्कात असतात. पक्ष संघटनेत वरिष्ठ स्तरावरून आपला सन्मान होईल. असे मला त्यांनी त्यावेळीच सांगितले. त्यामुळे माझ्या मनात कुठलेच किंतु परंतु नाही. शिवसेना संघटना मजबूत हेच आमचे लक्ष आहे. पक्षात जुने पदाधिकारी तसेच नव्याने पक्षा सोबत जोडलेले हे सर्व एकसंघ काम करतं आहेत. अनेक नियुक्त्या बाकी आहेत. जेष्ठ तसेच सर्वाना संधी दिली जाईल. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अग्रेसर हेच आमचे लक्ष आहे. असेही वर्षा कुडाळकर यांनी सांगितले.