रत्नागिरीत राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेतर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

 

रत्नागिरी: राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी यांच्या तर्फे मानाच्या भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, ५ ऑगस्ट ते गुरुवार, ७ ऑगस्ट या तीन दिवसांत होणार आहे.
राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता होईल. ही स्पर्धा निमंत्रित संघांसाठी असून, विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि शिल्ड दिली जातील. प्रथम क्रमांकासाठी १०,१०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,१०० रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २,५०० रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक शिल्ड ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू खेळाडू यांनाही आकर्षक शिल्ड देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी स्पर्धा संपल्यावर होणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी भाग घ्यावा आणि क्रीडा रसिकांनी कबड्डीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राजन मलुष्ट, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू आणि सेक्रेटरी मकरंद खातू यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य धुंदूर (९४०३९४१५०९) किंवा सेक्रेटरी सागर कळंबटे (९६२३६५५९१९) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.