खंडाळा | वार्ताहर : शुक्रवार दिनांक 1/08/2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राम विकास मंडळ वाटद मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता आठवीच्या स्वरूप जोग यांच्या अत्यंत सुंदर आणि उत्साही सूत्रसंचालनाने केली. दीप प्रज्वलन करून त्यानंतर लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रकाश कारखानीस शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. आशिष वासावे सर, पर्यवेक्षिका सौ. देविका मांगले आणि शिक्षक प्रतिनिधी सौ. शेट्ये हे मान्यवर उपस्थित होते.
यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषणे सादर केली. या दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील दुसरी,तिसरी व पाचवीच्या मुलांनी लोकमान्य टिळकांवर गीत गायन केले.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. शेट्ये मॅडम यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक यांची माहिती नसलेली बाजू विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यानंतर मुख्य पाहुणे कारखानीस सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वसावे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











