तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये संगमेश्वरच्या तायक्वांडोपट्टूंचे सुयश

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, दळवी वृंदावन देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राज्यसंघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा व तालुका सचिव प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, क्लब उपाध्यक्षा ॲ.सौ.पुनम चव्हाण,नगरसेवक सिद्धेश वेल्हाळ, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,पालक प्रतिनिधी अदिती लोध, भागवत मॅडम, देशपांडे मॅडम,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, मयुरी राऊत आदी उपस्थित होते. या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, व लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे

येलो- शौर्य मिर्गल, अभिज्ञा राणे, आरुष जाधव, आर्य भोसले, सांची मुंडेकर, संस्कृती चव्हाण, हर्ष राजपुत
ग्रीन – निकुंज घडशी, प्रचिती कांगणे, शौनक राजवाडे, मिहिका लाड, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, उर्वी किल्लेदार, हिरन्मयी भागवत, हेरंब भागवत, अनुराग यादव.
ग्रीन-वन – जीवित देशपांडे, पूर्वा रहाटे, ओमराजे महाडिक,
ब्ल्यु- सई संसारे, तनिष्का कांगणे. संस्कृती कांगणे.
ब्ल्यु-वन – स्वानंदी कांगणे, शर्विल कांगणे, आरोही तांबे, यश तांबे, सोहम चव्हाण, वरद शेट्ये.
रेड – अबीर शेट्ये, ऋतिक कांगणे, ईशान भागवत, यशराज कटके, पृथ्वीराज कटके.
रेड-वन – आदित्य चिपळूणकर, मल्हार साने.

या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, देवरुख शहराच्या नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, नगरपंचायतचे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले,जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू , क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, क्लब सदस्या स्वाती नारकर, रुपाली कदम,अनुजा नार्वेकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, सिनियर खेळाडू निखिल लाड, सौरभ वनकर, पंकज मेस्त्री, मृणाली सार्दळ, प्रथमेश शेट्ये, संकेत मापुस्कर, गायत्री शिंदे, सानिका प्रसादे, सुशांत मेस्त्री, सिद्धी केदारी, वेदांत गिडये व सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.