सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी *स्वातंत्र्य सेनानी युगपुरुष* *लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी* व *लोकशाहीर* *अण्णाभाऊ साठे* *यांची जयंती* संयुक्तपणे संपन्न झाली.
टिळक पुण्यतिथी कार्यक्रमास अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या. तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका दिव्यता नागवेकर उपस्थित होत्या. प्रथम प्रमुख वक्त्या दिव्याता नागवेकर यांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तसेच नगरपरिषद रत्नागिरी तर्फे टिळक जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेमध्ये प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता यामध्ये ते बक्षीस पात्र ठरले. त्यामध्ये नमिता सागवेकर, मेघना जंगम , युवराज कारकर,अक्षता खामकर, आर्या सावंत, स्वरा पवार यांना प्रशस्तीपत्रके देऊन अभिनंदन केले व त्यांनी आपले लोकमान्य टिळका विषयी केलेल्या भाषणाचे सादरीकरण केले व नगर परिषदेतर्फे देण्यात आलेल्या प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिसांचे वितरण करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दिव्यता नागवेकर यांनी लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान नेते होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात स्वातंत्र्यासाठी पाठिंबा, धैर्य आणि अटळ समर्पण दिसून येते असे सांगितले. ब्रिटिश सरकारला देशातून परतवून लावण्यासाठी केशरी व मराठा वृत्तपत्र सुरू करून अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनतेत उठाव निर्माण केला व भारतीय जनतेला एकत्र करण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सवासारखे कार्यक्रम सुरू केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका संजना तारी यांनी लोकमान्य टिळकाबरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकार्याचा आढावा घेतला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. अण्णाभाऊ साठे हे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते, परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लेखनातून इतिहास घडवला. कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य, नाटक चित्रपटातून उत्कृष्ट भूमिका ही केल्या होत्या असे सांगितले.
कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी
बोटके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल सागवेकर यांनी मानले.