ख्रिस्त ज्योती कॉनव्हेन्ट हायस्कुल वालोपे चा निकाल १००%

गौरव पोंक्षे माखजन:
चिपळूण तालुक्यातील ख्रिस्त ज्योती कॉनव्हेन्ट हायस्कुल वालोपे या शाळेचा एस.एस.सी.चा निकाल १००% लागला आहे.
१५९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ६९ विशेष श्रेणी,६२प्रथम श्रेणी,२८ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
यामध्ये हर्षा आंब्रे ९८.४०% प्रथम,संस्कृती मोरे ९६.४०%,सार्थक केळसकर ९५.६०% मिळवत तृतीय आला.यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक,संस्था संचालक यांनी अभिनंदन केले आहे.