ज्ञानदीप स्कूल मोरवंडे- बोरज मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न*

खेड । प्रतिनिधी
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे- बोरज या प्रशालेत लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री.भरत मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम आंब्रे व श्री. मंदार भोसले यांनी लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली. सौ. पूनम आंब्रे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपट उलगडला. कार्यक्रमांचा समारोप श्री. आशिष देशमाने यांनी केले.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भरत मोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेस अभिवादन केले.