डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शिक्षणाचा मूलमंत्र समाजघटकापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम

 

शिरगांव (प्रतिनिधी) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने देवगड तालुक्यातील ३० गावांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षणाचा मूलमंत्र समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात मिठबांव येथील बुद्धविहार येथून झाली. या वेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे माजी अध्यक्ष जयवंत मिठबावकर यांनी हा समजोपयोगी उपक्रम असून युवकांनी असे उपक्रम कायम सुरु ठेवावेत.आरे गावचे माजी पंचायत समिती सदस्य तसेच बौद्धजन सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. अजित बाबू कांबळे म्हणाले, “युवा प्रतिष्ठानने अल्पावधीत सामाजिक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठळकपणे जाणवते.”

या दौऱ्यात मिठमुंबरी, हिंदळे आणि इतर गावांतील पालक व ग्रामस्थांनीही उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. शैक्षणिक साहित्याच्या वितरणामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना आधार मिळाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवडेकर,

उपाध्यक्ष अमोल जाधव, सचिव मोहनिश मुंबरकर, सहसचिव अनिकेत मिठबांवकर,

खजिनदार अमोल मिठबावकर, सल्लागार रत्नदीप दयाळ कांबळे (पत्रकार),

सुमित जाधव, सागर ओंबळकर, अस्मित कदम, सुहास मिठबांवकर, अक्षय मिठबांवकर,

पार्थ कदम, शैलेंद्र मिठबांवकर, जीवन कदम, समीर ढोके व इतर युवा स्वयंसेवक उपस्थित होते.