डी. बी. जे. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन
चिपळूण (प्रतिनिधी)– : माझी जडणघडण राष्ट्रीय सेवा योजनेमुळे झाली. राष्ट्रीय सेवा योजनेची एक वेगळी ओळख आहे. या राष्ट्रीय सेवा योजनेमुळे अनेकांच्या जीवनामध्ये बदल होतो तसा माझ्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला. मी प्रशासकीय अधिकारी झालो हे राष्ट्रीय सेवा योजनेचे फलित आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनासाठी केले. या कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, युवकांनी व्यसनापासून दूर राहायला हवे. नियमित वाचन करणे, समाज सेवा करणे समाज सेवा करतांना पहिल्यांदा स्वत:ला ओळखलं पाहिजे. समाज सेवा करतांना सदविवेक बुद्धीला पटलं पाहिजे. आज समाज सेवेच्या नावावर दांभिकपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तशा समाज सेवेपासून दूर राहिले पाहिजे. सेवा, नेतृत्व, समाज या त्रीसूत्रीचा आवलंब केला पाहिजे, असे शेवटी श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट म्हणाले की, महाविद्यालायतील राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग असून या विभागातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व उदयाला येते. समाज सेवा विद्यार्थ्यांच्या मनात असेल तर आजचे विद्यार्थी नक्कीच घडतील, अशी आपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अतुल चितळे, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, डॉ.चेतन आठवले, प्रबंधक अनिल कलकुटकी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सदस्य प्रा. गौतम ब्रह्मे, प्रा.अस्मिता जोशी प्रा. नुपूर मुळ्ये-खरे, प्रा.सई सुर्वे प्रा.सर्वेश कुंदरगी, प्रा.स्नेहा निमुणकर, प्रा.त्रिवेणी मोहोळकर, प्रा. पूर्वा कापडी, प्रा. कृतिका लाड व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम, प्रमुख पाहिण्यांचा परिचय कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय शिंदे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – श्रावणी खेडेकर, श्रावणी भैरवकर आभार गौरी शिगवण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी मनीष डोंगरे,तेजल पवार, रवी राठोड,अभिनंदन कदम, परिश्रम घेतले.












