युवा व्यापारी मयू पारकर यांची तत्परता
मालवण | प्रतिनिधी : मालवण बाजारपेठ येथे वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एक घार पारकर किराणा मर्चंट समोर जखमी अवस्थेत पडली. घार पडल्याचे पाहून व्यापारी मयू पारकर यांनी धाव घेत घारीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र घारीला अधिक हालचाल तसेच उडता येत नव्हते. मयू पारकर यांनी याबाबत लगेच वनविभागला माहिती दिली. काही वेळाने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. प्राथमिक उपचार करून घारीला सुखरूप घेवून गेले. वन्यजीवांप्रती दाखवलेल्या तत्परते बाबत तसेच मदतकार्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पारकर किराणा मर्चंटचे मालक नाना पारकर, मयू पारकर यांचा सोबत उद्धव देसाई, गणेश भट आणि अक्षय मालवणकर मदतकार्यात सहभागी झाले होते.













