सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीतर्फे ‘हर घर तिरंगा’ हे अभियान ४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संयोजकपदी युवा नेते संदिप गावडे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही घोषणा केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडीनंतर संदिप गावडे यांनी सावंतवाडी शहर आणि चौकुळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा भारतीय तिरंगा ध्वज उभारण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.












