668 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकलेली वेतन वाढ दिली.
जि. प. दोन बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर
सिंधुनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 668 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढ फरकाचा लाभ मिळणार आहे. चार कोटी चौसष्ठ लाख साठ हजार पाचशे चौपन्न रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. व ही वेतन वाढ फरक त्यांच्या बँक खातात जमा होत आहे. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील व सध्या सावंतवाडी पंचायत समिती मध्ये बदली झालेल्या त्या कर्मचाऱ्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत त्याला नोटीस बजावली आहे. व जलजीवन कामाशी संबंधित असलेल्या एका कर्मचाऱ्याची तात्काळ बदलीने कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये अनेक पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. दिवाबत्ती कर्मचारी 69, लिपिक 34, पाणी पुरवठा योजनेवरील कर्मचारी 188, सफाई कामगार व शिपाई 370 अशा एकूण 668 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर 2020 ते मार्च 2022 पर्यंत देय असलेला वेतन वाढीतील फरक मिळाला नव्हता. शासनाकडून हा निधी नुकताच प्राप्त झाला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची ही रक्कम त्यांच्या खात्यात अदा करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. असे रवींद्र खेबुडकर यांनी स्पष्ट केले.
बेशिस्तीमुळे दोघा कर्मचाऱ्यांवर कारवाई
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात कार्यरत असताना लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी लाभार्थ्याकडून आर्थिक रक्कम उकळलेल्या त्या कर्मचाऱ्याला काने दाखवा नोटीस भजनात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांची सध्या सावंतवाडी पंचायत समितीमध्ये बदली झाली असून या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत त्याची चौकशी सुरू झाली आहे. तर जलजीवन विभागात कार्यरत असलेल्या त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे त्याला त्या पदावरून दूर करून अन्य ठिकाणी बदली करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी यावेळी दिली.
150 भजनी मंडळांना साहित्य अनुदान देणार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच देण्याची योजना जिल्हा परिषद दरवर्षी राबवीत असते. यावर्षी पूर्वी लाभ न दिलेल्या 150 भजनी मंडळांना प्रत्येकी 12,975 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यातून ही मंडळे भजनी साहित्य खरेदी करू शकतील. किंवा जुन्या साहित्याची दुरुस्ती करू शकतील. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात तीन मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे. असेही रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी सांगितले.











