कोकण विभागीय आयुक्त उद्या करणार नापणे धबधब्याची पाहणी

वैभववाडी प्रतिनिधी
नापणे धबधब्यावर बांधण्यात आलेल्या काचेच्या पुलासह परिसराची पाहणी मंगळवार दि. ५ ऑगष्ट रोजी दुपारी १२ वा. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या सिंधूरत्न योजनेतून नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. हा काचेचा पूल राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त या पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. धबधबा परिसराची पाहणी, पर्यटकांना भविष्यात कोणकोणत्या सुविधा निर्माण कराव्या लागतील, त्यासाठी जागेची उपलब्धता याबाबत आयुक्त माहिती घेणार आहेत.