सततच्या वाचनातूनच स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलण्याची क्षमता निर्माण होते –उर्मिला सांबारी

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

सध्याच्या युगात नवनवीन स्पर्धा परीक्षांची आव्हाने विद्यार्थ्यांसमोर उभी राहत आहेत.ती पेलण्यासाठी विविधांगी पुस्तकांच्या सततच्या वाचनातूनच विद्यार्थ्यांनी क्षमता निर्माण करण्याचे आवाहन रामेश्वर वाचन मंदिराच्या सहकार्यवाह सौ उर्मिला सांबारी यांनी केले. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.यावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,श्रीमती वैशाली सांबारी, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे,सौ दिपाली कावले यांच्या सह वाचनालय सांस्कृतिक समिती सदस्य, कर्मचारी,वाचक प्रेमी ग्रामस्थ, विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.

देणगीदार सौ उज्वला सरजोशी, जयप्रकाश परुळेकर,सौ उर्मिला सांबारी, यांच्या देणगी मधून १०वी१२वी मध्ये प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना,अभिजित जोशी यांच्या देणगी मधून शिष्यवृत्तीधारक तर श्रीमती लक्ष्मी कानविंदे यांच्या देणगीतून दहावी मध्ये संस्कृत, गणित विज्ञान विषयात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.