भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे .या निमित्ताने नवनिर्माण हाय शाळेने क्रांती दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी दुपारी 12 ते पाच या वेळेत देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आयोजित केली आहे .
सदरील स्पर्धा दोन विभागात विभागली गेली आहे .प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते नववी. प्रवेश नोंदणी अंतिम तारीख दिनांक ८ ऑगस्ट सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत शाळेच्या ऑफिसमध्ये करावी .स्पर्धेसाठी लागणारे प्रवेश अर्ज आणि प्रवेश फी शाळेच्या कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते पाच करावी. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. स्पर्धेचे नियम आणि अटी प्रवेश अर्जात देण्यात आलेले आहे .रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण . अनेक शाळांना त्यांच्या मेल आयडीवर मेल पाठविण्यात आलेले आहे तरीसुद्धा ज्यांना कोणाला मिळाले नसतील त्यांनी त्वरित संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल फोन.९४२२०१७८१२












