शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चौके हायस्कूलचे यश

 

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी यशस्वी विद्यार्थ्यांची निवड 

चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुका शालेय स्तरावरील कुस्ती स्पर्धा मालवण जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नुकतीच पार पडली.या स्पर्धेत चौके येथील भ.ता,चव्हाण,म.मा विद्यालय चौके या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारत उल्लेखनीय यश प्राप्त केले. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षांखालील मुलगे गटात – कु.विराज विनोद जाधव ६ वी- ३५ किलो वजनी गट-प्रथम क्रमांक १७ वर्षांखालील मुलगे कु.मितेश रामचंद्र आंबेरकर दहावी ६० किलो वजनी गट– प्रथम क्रमांक कु रामचंद्र संतोष झोरे- दहावी -६५ किलो वजनी गट-प्रथम क्रमांक कु वैभव विनोद जाधव १० वी- ८० किलो वजनी गट- प्रथम क्रमांक कु.जगन्नाथ शैलेश कदम-१० वी ७१ किलो वजनी गट-प्रथम क्रमांक कु.शुभम संतोष झोरे- ८ वी – ३८ किलो वजनी गट- द्वितीय क्रमांक कु.भावेश सिताराम गावडे- १० वी- ९२ किलो वजनी गट- द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री.विरकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सर्व सहभागी यशस्वी खेळाडूचे मुंबई तसेच स्थानिक संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांचे कडून खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले.