मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार आहेत.
गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
गाडी क्र. 01125 (लोकमान्य टिळक ट. ते मडगाव)
-
प्रस्थान : 14 ऑगस्ट 2025, रात्री 10:15 वा.
-
आगमन : मडगाव येथे 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 वा.
गाडी क्र. 01126 (मडगाव ते लोकमान्य टिळक ट.)
-
प्रस्थान : 15 ऑगस्ट 2025, दुपारी 1:40 वा.
-
आगमन : लोकमान्य टिळक ट. येथे 16 ऑगस्ट रोजी पहाटे 4:05 वा.
गाडी क्र. 01127 (लोकमान्य टिळक ट. ते मडगाव)
-
प्रस्थान : 16 ऑगस्ट 2025, रात्री 10:15 वा.
-
आगमन : मडगाव येथे 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 वा.
गाडी क्र. 01128 (मडगाव ते लोकमान्य टिळक ट.)
-
प्रस्थान : 17 ऑगस्ट 2025, दुपारी 1:40 वा.
-
आगमन : लोकमान्य टिळक ट. येथे 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4:05 वा.
गाड्या थांबतील अशा स्थानके :
ठाणे, पनवेल, पेन, रोहा, मंगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी.
डब्यांची रचना (Composition):
-
गाडी क्र. 01125/26 : 22 एलएचबी कोचेस — फर्स्ट एसी-1, सेकंड एसी-3, थर्ड एसी-7, स्लीपर-8, पँट्री कार-1, जनरेटर कार-2
-
गाडी क्र. 01127/28 : 22 एलएचबी कोचेस — सेकंड एसी-1, थर्ड एसी-6, जनरल-4, स्लीपर-9, एसएलआर-1, जनरेटर कार-1
आरक्षणाची सुरुवात :
गाडी क्र. 01126 आणि 01128 साठी आरक्षण 9 ऑगस्ट 2025 पासून सर्व PRS केंद्रांवर, IRCTC वेबसाइटवर आणि इंटरनेटद्वारे सुरु होईल. अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेची वेबसाईट पहा असे आवाहन जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.










