वेळंब येथे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत एस.के.-4 हळद रोपांची लागवड         

 

गुहागर(प्रतिनिधी): कृषी विभाग,जि.प.रत्नागिरी व पं.स.गुहागर च्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आज दि.26/6/23 रोजी वेळंब शेतकरी प्रगतीशिल शेतकरी विजय माळी यांच्या शेतावर SK-4 हळद रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ.समिक्षा बारगोडे,उपसरपंच श्री. श्रीकांत मोरे, पं.स.गुहागरचे कृषी अधिकारी श्री.आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रमोद राणे, सौ.श्वेताली घाडे, जयश्री जाधव, वैष्णवी घाडे, ग्राम विकास अधिकारी मंगेश पांचाळ, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे,शेतकरी विजय माळी उर्मिला माळी, विजया मोरे, वैभवी आरवलकर उपस्थित होते.