आमदार निलेश राणे यांनी केले सागराचे पूजन

मच्छिमार, व्यापारी व नागरिकांसोबत सागराला श्रीफळ अर्पण

मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात

मालवण | प्रतिनिधी : शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते असताना आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन करत
मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक यांच्या सोबत श्रीफळ अर्पण केले.

मच्छिमारांची, व्यापाऱ्यांची, तमाम नागरिकांची भरभराट होऊदेत असे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले.

मालवण बंदरजेटी येथे शहरातील मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या सोबतीने आले. श्रीफळ पूजन झाले. या सोहळ्यात आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, राजा गांवकर, शिक्षकेतर संघटना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, परशुराम पाटकर, गणेश प्रभुलकर, आबा हडकर, हरेश देऊलकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना पदाधिकारी सोनाली पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, महिला तालुकाध्यक्ष मधुरा तुळसकर, अरुण तोडणकर यांसह, व्यापारी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.