सावर्डे येथे केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
चिपळूण (वार्ताहर) : कुणबी शिक्षक विचारमंच सावर्डे विभाग यांच्या वतीने सावर्डे येथे अनंत शिगवण यांच्या निवासस्थानी असलेल्या सभागृहामध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि सेवानिवृत्त शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सावर्डे विभागातील अनेक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे कुणबी शिक्षक विचारमन सावर्डे विभाग यांच्या वतीने तीन ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत नवरंग, ॲड. संतोष कुळे, श्री कालप, शिक्षिका वैभवी खांबे, मंचाचे अध्यक्ष अनंत शिगवण, माजी अध्यक्ष संतोष कुमार भुवड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विचारमंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी पदवीधर आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कुणबी शिक्षक विचार मंचाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर सेवानिवृत्त झालेले शिक्षक यांचा सुद्धा या शिक्षक विचार मंचाने गौरव केला. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी
चंद्रकांत आत्माराम नवरंग,
शिक्षक संतोषकुमार यशवंत भुवड, शिक्षिका सौ. वैभवी वासुदेव खांबे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकार संतोष कुळे यांनी वकिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा या कुणबी शिक्षक विचार मंचाने सन्मान केला. या कार्यक्रमात कुणबी शिक्षक विचार मंचाचा थोडक्यात आढावा आपल्या प्रास्ताविकातून मंचाचे सचिव रवींद्र जोंधळे यांनी मांडला. कुणबी शिक्षक विचार मंच सावर्डे विभाग हे नेहमी सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा गरीब होतकर विद्यार्थ्यांना मदतीचा हात सुद्धा या शिक्षक विचार मंचकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना वेळोवेळी केले जात आहे. त्यामुळे निश्चितच कुणबी शिक्षक विचारमंच सावर्डे विभाग हा एका दीपस्तंभा प्रमाणे काम करत आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला दहावी-बारावीचे विद्यार्थी त्यांचे पालक त्याचबरोबर कुणबी शिक्षक विचारमंच सावर्डे विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला काही देणगीदारानी मदत केली. त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. या कुणबी शिक्षक विचार मंच अध्यक्ष अनंत शिगवण यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली.
कार्याध्यक्ष रविंद्र सखाराम घाणेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार हरिश्चंद्र घाणेकर यांनी मानले.











