डोंगरपालचे शेखर परब यांचा पुणेत सामाजिक सन्मान

बांदा : प्रतिनिधी

 

पुणे येथील हिमगिरी विद्यालय विद्यानगरमध्ये आयोजित शिक्षक सेवापुर्ती सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्यात डोंगरपाल येथील शेखर परब यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

पुणे शहरात सामाजिक कार्य करणारे शाळेचे माजी विद्यार्थी यांचा गौरव सोहळा पार पडला. शेखर परब यांनी पुणे शहरात सिंधुदुर्ग वासियांसाठी गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवले आहेत. शैक्षणिक मदतीसाठी ते कायम पुढे असतात. कोरोना काळात गरजूंना मदत, गणेशोत्सवात चाकरमान्यांना ज्यादा बसची सोय, कोकणवासियां साठी वधू वर मेळावा आयोजित करण्याबरोबरच अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात ते अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी शाळेचे माजी प्राचार्य सौ. सुरवसे, शिक्षक यज्ञकांत ढगे, दत्तात्रय बांडे, जयकर गवाळे, बाबाजी काळे तसेच शाळेचे इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश चौधरी, गौतम जाधव, संतोष दाभाडे, हेमंत दाभाडे, अनिता घोडे, प्रियांका कदम व अन्य माजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. शेखर परब यांचे सिंधुदुर्ग वासियांमधून अभिनंदन होत आहे.

——–