माखजन |वार्ताहर : प्रख्यात अभिनेते,दिग्दर्शक, निर्माता अंशुमन विचारे ३० जून रोजी संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी दिली.
यावेळी ते विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत.अभिनय क्षेत्रातील नव नवीन संधी याविषयीं ते मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी कलांगण चे निबंध कानिटकर,श्रीनिवास पेंडसे,अमोल लोध उपस्थित राहणार आहेत.
अभिनेते अंशुमन विचारे हे मूळ संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांनी ऑस्कर नामांकित श्वास चित्रपटातील एक भूमिका साकारून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
त्यांचे मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना पर्वणीच असणार आहे.