खेर्डी शिवाजीनगर येथे रस्त्याचे शिवसेना उपनेते आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी शिवाजीनगर येथील मिर्लेकर घर ते विष्णू सुर्वे घर या रस्त्याचे डांबरीकरण करणे हे काम शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजना – जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित केले होते. त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी या कामाला ७ लाख रूपयांच्या निधीसह मंजुरी दिली आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होत आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, खेर्डी सरपंच अश्विनी पंडित, उपसरपंच विनोद भुरण, सदस्य वृंदा दाते, अपर्णा दाते, सुप्रिया उतेकर, प्रकाश पाथरूड, विजय शिर्के, अभिजित खताते, सुगंधा माळी, वैशाली मोरे तसेच बाळा दाते, गजानन जाधव, आबा कापडी, विष्णू सुर्वे, महेश मिर्लेकर, उदय गोरे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी कामाची निकड जाणून काम मंजूर करुन घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला.