गोवंश तस्करीला प्रतिबंध करण्यात यावा

सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने करण्यात आली मागणी

लांजा पोलीस तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर

लांजा( प्रतिनिधी) २९ जून रोजी असणाऱ्या श्री देव पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतची निवेदन सोमवारी २६ जुलै लांजा तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की २९ जून रोजी बकरी ईद आहे. तसेच याच दिवशी श्री देव पंढरपूर यात्रा आहे. लांजा तालुक्यातून वारंवार गोवंश तस्करी होत असल्याचे वारंवार आढळून आलेले आहे. याबाबत पोलीस ठाणे लांजा येथे गुन्हे देखील दाखल नोंद झालेले आहेत. तरी २९ जून पर्यंतच्या कालावधीमध्ये गोवंश तस्करीची दाट शक्यता आहे. गोमाता ही आमची धार्मिक आस्था असून अशा प्रकारे तस्करी केल्यास आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करून गोवंश तस्करीला प्रतिबंध करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करताना सकल हिंदू समाज लांजाचे अध्यक्ष सचिन कदम तसेच ॲड.रुपेश गांगण, डॉक्टर समीर घोरपडे, भैरूलाल भंडारी, रुपेश चव्हाण, राहुल शिंदे, अशोक गुरव आदी उपस्थित होते