आमदार किरण सामंत यांचा मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी जनता दरबार 

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजन 

लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरातील आणि विशेषता नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट सकाळी ११ वाजता गणेश मंगल कार्यालय, आग्रे हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

लांजा शहर समन्वय समितीच्या मागणीवरून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यांचा शहर परिसरातील नागरिकांना त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींवर चर्चा करून त्याचे निवारण या जनता दरबारात केले जाणार आहे .

तरी या जनता दरबाराला लांजा शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.