शाहू महाराजांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली- प्रा. डॉ ज्ञानोबा कदम

चिपळूण (प्रतिनिधी) : बहुजन समाज हा आपला, अंधारात आहे पडलेला। मूळ कारण घ्यावे ध्यानाला, अज्ञानीपणा हा भवला। तेव्हा शिक्षण पाहिजे सर्वांला, असे वाटून शाहू राजाला प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी पाया घातला।। “सामाजिक न्याय व समानता निर्माण करण्यासाठी आणि दुर्बलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य काळाचे पुढचे होते.आजच्या आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची आणि कार्याची देशाला मोठी गरज आहे. त्यांचे कार्य केवळ पुस्तकात न ठेवता ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे, त्यांचे विचार जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहचवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख.डॉ.ज्ञानोबा कदम यांनी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. तत्कालीन सामाजिक विषमतेविरुद्ध शाहू महाराजांनी पुकारलेली मोठी क्रांती होती. त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरून समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हा लढा आजच्या तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे.” डी बी जे महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य स्नेहल कुलकर्णी, विजेयंद्र जाधव, प्रा.विराज ओक, प्रा. करिष्मा सागवेकर व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुरेश नलावडे यांनी तर प्रा. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चेतन खांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विविध विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते.