रत्नागिरी :
औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राचा व तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्राचा निकाल मुंबई विद्यापीठ तर्फे नुकताच जाहीर करण्यात आला.
सदर निकालात ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले.
सहाव्या सत्रात *कुमारी.रेणू घोरपडे (09.13)* प्रथम क्रमांक, *कुमार सिद्दिक हडपोलकर (08.33)* द्वितीय व *कुमारी आकांक्षा बडदे (८.२७)* तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रात *कुमारी सिद्धी पाचकुडे व कुमारी वैष्णवी पाटील (८.५०)* संयुक्तिक प्रथम, *कुमारी आर्या जगातिया व कुमारी महेनूर कच्छी (८.४३)* संयुक्तिक द्वितीय व *कुमार सैफान घटवाल व कुमार इद्रिस मुकादम (८.३१)* संयुक्तरीत्या तृतीय आले. एकूण निकालातही महाविद्यालयाने कोंकण परिक्षेत्रात अल्पावधीतच उत्तम निकालाची परंपरा राखली आहे.
सदर उत्कृष्ठ निकालाबाबत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी,उपाध्यक्ष डॉ.रमण तलाठी, सेक्रेटरी श्री.माधव पेठे, संस्थापक सेक्रेटरी श्री.प्रकाश गुजराथी, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री.दीपक लढ्ढा तसेच गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्ष श्री.अनिल शिवदे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री.रुपल पाटणे व इतर सर्व सन्माननीय संस्था सदस्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच महाविद्यालय सर्वोत्कृष्ट निकालासाठी व औषधनिर्मिती क्षेत्रात सर्वोत्तम करिअर घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महाविद्यालय टीम च्या वतीने प्राचार्य डॉ.सुजित नगरे यांनी दिली.











