हिरवाईने नटले सिंधुदुर्ग विमानतळ….

परुळे : शंकर घोगळे

सर्वदूर पसरलेल्या हिरवाई मुळे सिंधुदुर्ग विमानतळ भासत आहे खऱ्या अर्थाने “ग्रीन फिल्ड एअरपोर्ट”.. विमानतळावर आजूबाजूला पसरल्या आहेत हिरवळ. सिंधुदुर्ग विमानतळाची निर्मिती होताना तो ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणुन जाहीर झाला आहे. साध्या येथे त्यादृष्टीने काम सुरू आहे. मात्र कोकणात ज्याप्रमाणे हिरवागार निसर्ग झाला आहे, त्याप्रमाणे हा देखणा विमानतळ हिरवाईने नटला आहे. त्यामुळे विमान प्रवासी येथून प्रवास करताना या सुंदर निसर्ग सौंदर्याकडे बघून भारावून जात आहेत.

बर्‍याच वेळा काही प्रवाशी याच साठी एकदा तरी विमान प्रवास करतात. आणी आभाळातून आपला कोकण कसा दिसतोय यांसाठी कॅमेरा मध्ये कैद करीत आहेत. बरेच प्रवाशी या आठवणी व्हिडिओ मध्ये साठविणे पसंद करतात. मुळात सिंधुदुर्ग विमानतळ ची जागा ही विस्तीर्ण सडा आहे. पावसाळ्यात या जागेच सौंदर्य नेहमीच वे गळा लेवल असते हिरवाईने भरून जाते. याच मुळे हा विमानतळ साध्या ग्रीन फिल्ड झाला आहे.