गडकिल्ले हे शौर्याचे, पराक्रमाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक- प्रभाकर लोके

खांबाळे येथे किल्ला बांधणी स्पर्धेत विठ्ठल रखुमाई साळुंखेवाडी प्रथम,

वैभववाडी प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पुस्तकात वाचण्याचा विषय नाही, तर तो आपल्या जगण्याचा, विचारांचा आणि प्रेरणेचा विषय आहे. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना गड-किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उभे असलेले हे गड-किल्ले म्हणजे आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत असे मत मुंबईचे निवृत्त पोलीस उपायुक्त प्रभाकर लोके यांनी येथे केले.

खांबाळे येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाला संतोष टक्के,माजी सरपंच मंगेश कदम,नदंकुमार राणे,गुरूनाथ गुरव,उमेश पवार,जगदीश पवार,राखी पवार,अस्मिता चव्हाण,आदी उपस्थित होते.

श्री.लोके म्हणाले आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात मुलांना इतिहासाची गोडी लागावी, त्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेली किल्ला बांधणी स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद आहे.किल्ला बांधताना तुम्ही केवळ माती, दगड आणि विटांचा वापर केलेला नाही, तर त्यातून तुमची कल्पकता, कलात्मकता, मेहनत, नियोजन आणि सांघिक भावना दिसून आली आहे.या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व बालकांसाठी पावनखिंड,पन्हाळ गड सहल आयोजित करण्याचे आवाहन करतानाच आर्थीक भार देखील उचलण्याचे अभिवचन आयोजकांना दिले.

श्री.टक्के म्हणाले शिवाजी महाराजांच्या जीवनातून काही गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे. शिवरायांचे धाडस, दूरदृष्टी, नियोजन, नेतृत्वगुण, सर्वधर्मसमभाव आणि रयतेविषयीची आस्था हे गुण आपल्या जीवनात आणले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.

किल्ले बांधणी स्पर्धेत
प्रथम क्रमांक – श्री विठ्ठल रखुमाई साळुंखेवाडी
व्दितीय क्रमांक -शिव सह्याद्री टेंबवाडी
तृतीय क्रमांक – शिवप्रेमी साळुंखेवाडी,उत्तेजनार्थ
श्री गवळदेव मोहीतेवाडी ,श्री आदिष्टी देवी मधलीवाडी ,हरे कृष्णा मधलीवाडी यांना रोख रक्कम,चषक आणि प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम पवार, अंबाजी पवार, संकेश पवार,राजेंद्र साळुंखे, मंगेश कांबळे, अक्षय पवार, योगेश पवार,मेघनेष पवार, वैभव पवार, मंगेश सुद, मुकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.