न्यु इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1975 ओल्ड एस.एस.सी. बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात
गुहागर l प्रतिनिधी :न्यु इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे हायस्कूलच्या 1975 ओल्ड एस.एस.सी. बॅचचे स्नेह संमेलन नुकतेच शांताई रिसॉर्ट येथे पार पडले.तब्बल 50 वर्षानंतर विध्यार्थी एकत्र आले.
शाळा हे सर्वात मोठे विद्यामंदिर आहे.आपण जिथे घडलो आणि आजवर मोठ्या पदावर पोहचलो ज्या सहकाऱ्यांसोबत बागडलो त्यांच्यासोबत शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करणे नेहमीच अविस्मरणीय असते. तब्बल 50 वर्षानंतर
“शांताई रिसॉर्ट”मोडका आगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी तत्कालीन वर्ग शिक्षिका श्रिमती अभ्यंकर मॅडम,श्री परचुरे सर व सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या संपदा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.या स्नेह संमेलनाचे नियोजन शरद पवार,दत्तकुमार शिगवण,प्रमोद शिर्के, गजानन शिर्के,सुलेमान गनी मेमन, सहकारी विद्यार्थी व मित्रपरिवार यांनी मिळून केले.












