सावंतवाडी : सनोफी, पिरॅमल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, आणि आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माजगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला गावातील रहिवाशांनी मोठा प्रतिसाद दिला.
या शिबिरात मुख्यतः एचबी (HB) तपासणी आणि असांसर्गिक आजारांची (NCDs) तपासणी करण्यात आली. या आरोग्य उपक्रमासाठी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट, ख्रिश्चनवाडी माजगाव गरड यांनी जागा उपलब्ध करून दिली.
या उपक्रमात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे आणि शरदिनी बागवे यांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये डॉक्टर सुप्रिया धाकोरकर, आरोग्यसेविका प्रतिभा परब, शीला डिमेलो, नेहा सावंत, नम्रता सावंत, अमिषा कुंभार आणि साहिल मोरजकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
गावकऱ्यांनी या सर्व उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानले. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळण्यास मदत होते.











