अभियांत्रिकीसाठी आता प्रवेशाच्या ४ फेऱ्या होणार

कणकवली: राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी यंदापासून तीनऐवजी चार फेऱ्या घेण्यात येणार असून, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशदेखील गुणवत्तेच्या आधारेच देण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

अभियांत्रिकीसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलेली जी महाविद्यालये असतील, त्या प्राधान्यक्रमामधील अनुक्रमे एक, तीन आणि सहा महाविद्यालये त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात येतील. यासोबत जे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून प्रवेश घेणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचे अर्ज सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यामुळे संपूर्ण कारभार पारदर्शक होईल आणि गुणवत्तेच्या आधारेच त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होईल.

अशा पद्धतीचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

*असे होणार बदल -*

• CAP च्या तीनऐवजी चार फेऱ्या मध्ये प्रवेश पार पडणार.

• CAP -1 मध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या college choices पैकी जर पहिले कॉलेज जर मिळालं तर त्या ठिकाणी त्यांना admission घ्यावाच लागणार. तसेच CAP- 2 मध्ये पहिल्या तीन choices पैकी जर एक college choice मिळालं आणि CAP-3 मध्ये पहिल्या सहा college choices पैकी जर एक college choice मिळालं तर त्याठिकाणी admission घ्यावाच लागणार.

• CAP -1,CAP-2 आणि CAP-3 मध्ये जर एक, तीन, सहा या व्यतिरिक जर एखाद college choice मिळालं आणि जर विद्यार्थ्यांना त्याच्या वरील College choice अपेक्षित असेल तर विद्यार्थी पुढील CAP Round मध्ये भाग घेऊ शकतात.

 

• व्यवस्थापन कोट्यामधील प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर होईल त्याची माहिती पोर्टलवर जाहीर करण्यात येईल

.

 

*सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (SSPM), कणकवली चे प्राचार्य. डॉ. डी.एस. बाडकर* यांनी या बदलासंदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास *प्रा. सचिन मेस्त्री (७५८८५०५२८५), प्रा. इम्रान पटेल (९७३०८०२०४६)* या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले आहे.