कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर – कोल्हापुरस्थित देवी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिरात सोमवार, ११ ऑगस्ट आणि मंगळवार, १२ ऑगस्ट या दोन दिवसांसाठी दर्शन बंद राहणार आहे. मंदिरातील मूर्तीवर संरक्षण प्रक्रियेचे काम या दिवशांमध्ये पार पाडले जाणार असल्याने हे निर्णय घेतले गेले आहे .

या संरक्षण प्रक्रियेअंतर्गत, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची परवानगी घेऊन, मूर्ती दीर्घकाळ सुस्थितीत राहावी याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश देण्यात येईल. या काळात भाविकांना पीतळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच व्यवस्थापन समितीकडून भाविकांचे सहकार्यही अपेक्षित आहे .

दर्शनाची सेवा बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहे .