मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

 

न्हावेली । प्रतिनिधी: मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्यावतीने आयोजित लकी ड्रॉचे बक्षीस वितरण मळेवाड येथील गजानन महाराज मंदिरात नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. संघटनेने याप्रसंगी समाजातील व्यक्तींना उपयुक्त साहित्याचे वाटपही केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाभिक समाजाच्यावतीने पत्रकार निलेश परब तसेच सुरेश पाटील, उत्तम न्हावेलकर आणि आनंद न्हावी यांसारख्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉमध्ये सुनील न्हावेलकर यांनी पहिले, संदेश आरोसकर यांनी दुसरे, तर अजय तळवणेकर यांनी तिसरे बक्षीस पटकावले. या प्रमुख विजेत्यांसह इतर उत्तेजनार्थ बक्षिसेही यावेळी वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला नाभिक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष सदानंद पवार, शांताराम वेतुरेकर, दया वेंगुर्लेकर, चेतन तोरस्कर, हनुमंत कारीवडेकर, मळेवाड पंचक्रोशी विभाग अध्यक्ष अजय तळवणेकर, सुनील न्हावेलकर, पुरुषोत्तम न्हावी, आनंद न्हावेलकर, संदेश आरोसकर, नंदकिशोर चव्हाण, नवनाथ तिरोडकर, वसंत चव्हाण, अमित न्हावी आणि मनोहर कवठणकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ तिरोडकर यांनी केले.