नेपाळमध्ये ‘सलीम पिस्टल’ला अटक – भारताच्या सर्वात मोठ्या हत्यार तस्करावर मोठी कारवाई

मुंबई  – माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख, ज्याला ‘सलीम पिस्टल’ म्हणून ओळखले जाते, त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दिल्ली पोलीस स्पेशल सेल व भारतीय सुरक्षा एजन्सी यांच्यातील संयुक्त ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात आली .

 

सलीम पिस्टल हा देशातील सर्वात मोठा अवैध हत्यार तस्कर म्हणून जाहीर आहे. अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानातून भारतात उच्च दर्जाची हत्यारं तस्करी करत असून त्याचे पाकिस्तानच्या ISI व D-Companyशी संबंध असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे . तसेच, सलीम लॉरेन्स बिष्णोई आणि हाशिम बाबा यांसारख्या कुख्यात गुंड टोळींना हत्यारपुरवठा करत होता .