लांजा ( प्रतिनिधी) डि.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल, लांजा या प्रशालेने जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.
. सदरची स्पर्धा नुकतीच चिपळूण येथे संपन्न झाली. या स्पर्धेत डी.जे.सामंत शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पदके मिळवली. कॅडेट गट मुलांमध्ये रुद्र संजय सुर्वे याने सुवर्णपदक पटकावले तर, सय्यद साद साजिद सलीम,भाव्य हरेश पटेल यांनी रौप्य पदक आणि नैतिक रामेश्वर शेट्ये ,राकेश बाळू पवार,श्रेयस समीर सावंत यांनी कांस्य पदक संपादन केले. भाविन विनोद पटेल, आफताब झहीर कोंडकरी, अब्दुल्ला रईस सय्यद,अर्श म्युझिब कालसेकर, प्रतीक मंगेश कोतवडेकर, साकीब कोंडकरी यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीयपंच, प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. या सर्व खेळाडूंचे श्री साई एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डि.जे सामंत इंग्लिश मिडीयम प्रशालेचे अध्यक्ष आर. डी. सामंत व दिपक कामत,सौ. समीक्षा कामत, संजय तेंडुलकर, जितेश गावकर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उपाध्ये, . क्रीडा शिक्षक कु. तेजस्विनी आचरेकर तसेच शाळेतील शिक्षक वृंद, इतर कर्मचारी, संस्थेतील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.












