जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण – दोघे जखमी, ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
जमिनीच्या आणि आर्थिक वादातून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवार 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वा.सुमारास नाचणे येथील आय.टी.आय कॉलजे जवळ घडली.
स्वप्नील लिगनूरकर (26),सोनाली लिगनूरकर (45,दोन्ही रा.देवरुख संगमेश्वर,रत्नागिरी) आणि स्वप्नीलचा एक मित्र (नाव-गाव माहिती नाही) या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सुभाष मनोहर खाडे (40,रा.टेंभ्ये खाडेवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री फिर्यादी सुभाष खाडे आणि त्यांचा मित्र हे दोघे आयटीआयजवळ संशयितांसोबत जमिनीच्या व पैशांच्या व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड तसेच हातांच्या ठोशांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.