गोळप ग्रामपंचायतीसमोर काळोखात लपलेल्या वृद्धाविरोधात गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीच्या पुढील बाजूस काळोखात लपून संशयास्पद हालचाली करणार्‍या वृध्दाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.15 वा.सुमारास करण्यात आली.
सोबान हसन सारंग (78,रा.गोळप मोहल्ला मुसलमानवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंळवारी रात्री संशयित वृध्द गोळप ते रत्नपार जाणार्‍या रस्त्यावरील गोळप ग्रामपंचायतीच्या पुढील बाजूस अदखलपात्र गुन्हा करण्याच्यास इराद्याने तोंडाला रुमाल बांधून काळोखात लपून बसलेला असताना मिळून आला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियू 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली.