खेड – ( प्रतिनिधी )
स्वातंत्र्यनिमित्त केंद्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ’हर घर तिरंगा’, ’आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत रोटरी स्कूलमध्ये दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या पर्वाहाला प्रारंभ झाला. पहिल्या पर्वामध्ये विद्यार्थ्यांसाठी तिरंगा थीमवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दुसऱ्या पर्वामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सदर स्पर्धेमध्ये 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, इ. 3री ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविणे स्पर्धा तर इ. 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स बनविणे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक व शाळेतील कलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर करत मनमुराद आनंद लुटला.











