पळसंब माजी सरपंच दिगंबर परब यांचे निधन!         

 

मसुरे (प्रतिनिधी ): पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी व पळसंब गावचे माजी सरपंच श्री. दिगंबर गोविंद परब यांचे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पळसंब शाळा, आर ए .यादव हायस्कूल व पळसंब गावातील तसेच सामाजिक, शैक्षर्णिक कार्यासाठी त्यांचे मोठे योगदान लाभले. तमाशा कलावंत म्हणून त्यांचे मालवण तालुक्यात मोठे नाव होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आजीव सभासद श्री. संजय परब व गोविंद परब यांचे वडील व श्री. परशुराम परब यांचे ते काका होत.