खेड प्रतिनिधी :
भारत सरकार व संरक्षण मंत्रालय आयोजित पेंटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मधील कुमारी राधा गांधी या विद्यार्थीनीने सहभाग घेतला होता. एकूण 6323 स्पर्धका मधून १९७ विजेते काढण्यात आले. या १९७ विजेत्यांमध्ये 36 वा क्रमांक राधाने प्राप्त केला असून 15 ऑगस्ट , स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून ही स्पर्धा घेण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनीला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या सोहळ्यास आमंत्रण मिळाले आहे. शाळेसाठी व तिचे पालक तसेच चिपळूण तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. राधा गांधी व त्यांचे पालक यांचे त्याबद्दल खूप कौतुक व अभिनंदन!!!
संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, नियामक मंडळ चेअरमन प्रफुल्ल महाजन, जनसंपर्क अधिकारी दिपक शेठ लढ्ढा ,चंदनशेट पाटणे, अनिल शिवदे, प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे व इतर संस्थापक सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.











