जि. प. आदर्श शाळा पोमेंडी खुर्द शाळेला देणगीदारांकडून 21 हजार रुपयांची लादी भेट

रत्नागिरी : 15 ऑगस्ट 2025 रोजी गावातील सचिन भगवान पिलणकर यांनी शाळेच्या वर्ग खोलीला २१ हजार रुपये किंमतीची लादी घालून दिल्यामुळे शाळेच्या सुशोभीकरणात मोलाची भर पडली आहे . त्यांच्या या उदार कार्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ सुरक्षित नीटनेटकी वर्ग खोली उपलब्ध झाली आहे .
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक .पालक . ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेतील कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना सचिन पिलणकर यांनी स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे तर अंगणवाडीला सिलिंग फॅन व बैठकांचे भेट दिली . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता .
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेले हे योगदान समाजातील प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे . शाळेला दिलेली ही मदत केवळ आर्थिक नसून सामाजिक जाणिवेतून केलेले योगदान असल्याचे मानले जात आहे . गावातील मुलांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी देणे लागतो , अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवली . त्यांच्या या कार्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वच्छ सुंदर वातावरण मिळाले असून समाजातील इतर दानशूर व्यक्तींना ही प्रेरणा मिळाली आहे . गावातील नागरिकांच्या अशा योगदानामुळे गावच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा मिळेल अशी भावना मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली .