रत्नागिरीत रविवारी ‘स्वराज्य गौरव’ सन्मान सोहळा

रत्नागिरी :
सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे लोकसेवा करणाऱया व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘स्वराज्य संस्था रत्नागिरी‘च्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता बसस्थानकासमोरील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या सभागृहात हा ‘गौरव सोहळा‘ पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सरकारी सेवेत असूनही जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवणाऱया व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमात एकूण 24 अधिकाऱयां गौरव करण्यात येणार असल्यो स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य संस्था रत्नागिरीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निवड समिती सदस्य परिश्रम घेतले आहेत.