लम्पी रोगावर मोहिम व पशु लसकरणाचे घोणसरी मध्ये प्रात्यक्षिक !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फोंडाघाट येथे असलेल्या ‘कृषी समृद्धी’ गटाच्या ९ कृषिमित्रांनी पशुवैद्य डॉ. तुषार वेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोणसरी ग्रामपंचायती येथे लम्पी रोग मोहिम व पशु लसकरणाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रमात लम्पी रोगबद्दल माहिती, त्याचे प्रतिबंधक उपाय व लसकरणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गोअट पॉक्स व्हॅक्सीन पशुधनासाठी, लसोटा व्हॅक्सीन कोंबड्यांसाठी आणि अँटी रेबीज व्हॅक्सीन कुत्रे व मांजरींसाठी देऊन संबंधित प्राण्यांचे लसकरण करण्यात आले. घोणसरी ग्रामपंचायतीच्या विविध वाड्यांमध्ये सुमारे ५० प्राण्यांचे लसकरण करण्यात आले.कार्यक्रम डॉ. तुषार वेरलेकर (पशुवैद्य), प्रसाद दिलीप राणे (सरपंच, घोणसरी ग्रामपंचायत), वॅलेरियन पिंटो (कर्मचारी, घोणसरी ग्रामपंचायत), गणेश मराठे (स्थानीय रहिवासी) यांच्या सहकार्याने व डॉ. विजय शेट्ये (प्रमुख, कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट), श्री देवू पवार (कृषी सहाय्यक, कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट), डॉ. नरेन्द्र प्रसादे (सहप्राध्यापक, कृषी महाविद्यालय दापोली) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये श्रीकेश राजीव, प्रतीक मोहंता, राहुल यादव, बजरंग चौधरी, सुमित गर्ग, आदित्य शेखर, ओम कुमार, वेल्सन फर्नांडेज आणि नागेश यांचा समावेश होता…..