कोलाड ते नांदगाव रोड आणि वेर्णा दरम्यान कार वाहतुकीसाठी आता २० ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार
मुंबई: कोकण रेल्वेने आपल्या ग्राहकांच्या मागणीचा मान राखत, कोलाड ते नांदगाव रोड आणि वेर्णा दरम्यान सुरू असलेल्या ‘रोल-ऑन/रोल-ऑफ’ (RORO) कार वाहतूक सेवेसाठीच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी १८ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत होती, मात्र संभाव्य ग्राहकांकडून आलेल्या विनंत्या लक्षात घेऊन, कोकण रेल्वेने नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
इच्छुक ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. या सेवेच्या अटी व शर्ती आणि नोंदणी प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी, कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला (www.konkanrailway.com) भेट द्यावी असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.













