रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी ७५० मिमी पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी एकूण ७४९.९८ मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याचा सरासरी पाऊस ८३.३३ मिमी इतका झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात नोंदवला गेला. खेड येथे तब्बल १७८.७१ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ दापोली (१२५.१४ मिमी) व चिपळूण (१२५.११ मिमी) तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. तसेच मंडणगड तालुक्यात ११६ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, संगमेश्वरात ५३.३३ मिमी, लांजा ५०.६० मिमी, गुहागर ४६ मिमी आणि राजापूरात ४०.८७ मिमी पाऊस पडला. तर रत्नागिरी तालुक्यात फक्त १४.२२ मिमी इतकाच पाऊस झाला.

जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.