मंडणगड, (प्रतिनिधी). :येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा.तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ प्रा. साई पवार, प्रा. प्राची कदम, प्रा. संजना दिवेकर मॅडम, प्रा. रिधा चिमावकर,प्रा. महेक पोशिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रा. अशोक कंठाळे यांनी कार्यक्रमचा उददेश स्पष्ट करुन नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, आज आपण सर्वजन आपले शालेय शिक्षण पूर्ण करुन महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सज्ज झाला आहोत. आपण सर्वांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबर आपल्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध विभागांच्या मार्फत आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याकरिता विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करुन आपले व्यक्तिमत्व विकसित करावे. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या शिस्तीचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने पेन व चॉकलेट देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साई पवार यांनी तर शेवटी आभार प्रा. महादेव वाघ यांनी मानले.
——–













