आमदार निलेश राणे यांनी रेडी येथे सप्ताहाला भेट देऊन घेतले माऊली देवीचे दर्शन

वेंगुर्ले: प्रतिनिधी

रेडी येथील प्रसिद्ध श्री माऊली देवी चा वार्षिक सप्ताह सुरू आहे. आज गुरुवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सप्ताहाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार निलेश राणे यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रितेश राऊळ, रेडी चे सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर तसेच नंदू रेडकर, भाई राणे, अण्णा गडेकर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.