प्रवाशांनी माहिती घेऊन पुढील प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन
कणकवली :कोल्हापूर जिल्हा, राधानगरी तालुका,येथे
देवगड निपाणी रोडवर फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आले आहे. हे पाणी कोल्हापूर राधानगरी देवगड निपाणी मार्गावर चढले असल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुराचे पाणी कमी होताच पुनश्च वाहतूक चालू केली जाणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांनी कळविले आहे.
दरम्यान सध्यस्थितीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.











